नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या पियुष पाटीलचा एस. पी. ज्युनिअर कॉलेज परंडा मध्ये भव्य सत्कार.
![]() |
| Grand felicitation of Piyush Patil, who achieved resounding success in the NEET exam, at S.P. Junior College, Paranda. |
परंडा दि. ३ (रंगोली न्यूज) : Grand felicitation of Piyush Patil, who achieved resounding success in the NEET exam, at S.P. Junior College. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून एस. पी. ज्युनिअर कॉलेज, परंडा तसेच तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थी पियुष विश्वनाथ पाटील याचा महाविद्यालयात भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
पियुष पाटील याने नीट-२०२६ परीक्षेत ५८८ गुण मिळवत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे, यापूर्वी इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या बोर्ड परीक्षेतही त्याने एस. पी. ज्युनिअर कॉलेजमधून प्रथम क्रमांक "Ranked first from S.P. Junior College" मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली होती. त्याच्या या सातत्यपूर्ण यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण परंडा तालुक्याचा गौरव झाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने पियुष पाटील तसेच त्यांची आई सुलभा पाटील यांचा प्राचार्य संतोष भांडवलकर व डॉ. सरपणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. शुभांगी सरपणे, मधुकर मुळीक, ललिता लिमकर, सिंधू पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी पियुषच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पियुष पाटील यांनी आपल्या यशाचे श्रेय आईचे मोलाचे प्रोत्साहन, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासाला दिले. योग्य ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी पियुषला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देत महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून संस्थेचे तसेच परंडा तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. पियुष पाटील यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्याने अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!