ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध; कठोर कारवाईच्या मागणीसाठी परंड्यात तहसीलदारांना निवेदन. Condemnation of MP Sanjay Raut's statement; memorandum submitted to the Tehsildar in Paranda demanding strict action.

खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध; कठोर कारवाईच्या मागणीसाठी परंड्यात तहसीलदारांना निवेदन.

Condemnation of MP Sanjay Raut's statement; memorandum submitted to the Tehsildar in Paranda demanding strict action.
Condemnation of MP Sanjay Raut's statement; memorandum submitted to the Tehsildar in Paranda demanding strict action.

परंडा दि. ३ (रंगोली न्यूज) : Condemnation of MP Sanjay Raut's statement; memorandum submitted to the Tehsildar in Paranda demanding strict action. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत परंडा येथे तहसीलदारांना सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, अशा प्रकारची विधाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाहीत. तसेच अशा वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, खासदार राऊत यांनी यापूर्वीही विविध संवैधानिक पदांवरील व्यक्तींविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली असून, अशा प्रकारच्या विधानांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष अरविंदबाप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सुखदेव टोंपे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, किरण देशमुख, साहेबराव पाडुळे, तुकाराम हजारे, श्रीराम देवकर, रामदास गुडे, नागेश शिंदे, राहुल वाघमारे, जयंत सायकर, योगेश डांगे, भगवान चव्हाण, गणपत शिंदे, राजेंद्र शिंदे, मनोहर पवार, यशपाल बनसोडे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments