ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे बाल-दिंडी सोहळा उत्साहात साजरा. 'Bal-Dindi' procession celebrated with enthusiasm at Sant Meera Public School, Paranda.

संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे बाल-दिंडी सोहळा उत्साहात साजरा

'Bal-Dindi' procession celebrated with enthusiasm at Sant Meera Public School, Paranda.
'Bal-Dindi' procession celebrated with enthusiasm at Sant Meera Public School, Paranda.

परंडा, दि. २४ (रंगोली न्यूज): 'Bal-Dindi' procession celebrated with enthusiasm at Sant Meera Public School, Paranda. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल-दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेचे संस्कार, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच प्रतिकात्मक पालखी पूजनाने झाली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगांच्या स्वरांत आणि *"ज्ञानोबा-तुकाराम"*च्या जयघोषात शाळेच्या परिसरातून बाल-दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हातात भगवे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमातील गोल रिंगण हे विशेष आकर्षण ठरले. वारकरी संप्रदायातील रिंगणाची परंपरा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केली. त्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी वारकरी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाला पारंपरिक स्वरूप दिले. मुलांनी धोतर, फेटा, टाळ, वीणा आदी वेशभूषा तर मुलींनी नऊवारी साडी, तुळशीमाळ आणि पारंपरिक पोशाख परिधान करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांनी भजन, गौळण, भारूड आणि भक्तिमय नृत्य सादर करत विठ्ठलभक्तीचा सुंदर आविष्कार घडविला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगांचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनाचा संदेशही प्रभावीपणे दिला.

यावेळी ह.भ.प. सीमाताई महाराज पाटील यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी वारीचे महत्त्व, संत साहित्याचे संस्कारमूल्य आणि विठ्ठलभक्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमास ढगपिंपरीच्या माजी सरपंच प्रज्ञा काळे, सुवर्णा देशमुख, सुप्रिया देशमुख, मीराबाई भगत, बप्पाजी काळे, काकासाहेब गवारे, अतिश देशमुख, बळीराम कोळी, बालाजी कोकाटे, अशोक राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक संतोष भांडवलकर, बालाजी गोरे आणि सांस्कृतिक विभागाने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मुख्याध्यापक संतोष भांडवलकर यांनी सांगितले की, "भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि नैतिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर बालपणापासून व्हावेत, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यासाठी शाळा सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी नांगरे व शुभांगी गोडगे यांनी केले. या भक्तिमय आणि संस्कारमय बाल-दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला असून, विद्यार्थी, पालक आणि उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments