ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात. A devotional Dindi procession was celebrated with great enthusiasm at the Global Educational Institute on the occasion of Ashadhi Ekadashi.

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

A devotional Dindi procession was celebrated with great enthusiasm at the Global Educational Institute on the occasion of Ashadhi Ekadashi.
A devotional Dindi procession was celebrated with great enthusiasm at the Global Educational Institute on the occasion of Ashadhi Ekadashi.

परंडा, दि. २४ (रंगोली न्यूज): A devotional Dindi procession was celebrated with great enthusiasm at the Global Educational Institute on the occasion of Ashadhi Ekadashi. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची व सण-संस्कृतीची ओळख व्हावी आणि भक्ती, संस्कार व सामाजिक ऐक्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातीला ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येथे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि. २४) पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसर 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गोरख मोरजकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव आशाताई मोरजकर, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे तसेच प्रा. माने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विठुरायाच्या पालखी पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढत शाळेच्या क्रीडांगणात पालखी मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी विठोबा, रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत जनाबाई यांसह विविध संतांची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली.

मुलांच्या हातातील सुंदर पालखी, भगवे ध्वज आणि मुलींच्या डोक्यावरची तुळशी वृंदावने पाहून जणू पंढरपूरच्या वारीचा साक्षात अनुभव उपस्थितांना मिळाला. वारकऱ्यांच्या वेशात, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध आणि नऊवारी परिधान केलेल्या विद्यार्थिनींमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला.

यावेळी आशाताई मोरजकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या "मायबापे केवळ काशी, तेणे न वजावे तीर्थासी" या अभंगाचे निरूपण करताना, आई-वडील हेच साक्षात देवस्वरूप असून त्यांची निःस्वार्थ सेवा, आदर आणि प्रेम हीच खरी भक्ती व संस्कारांची पायाभरणी आहे, असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी "जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम" या अभंगाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या तालावर पाऊल, फुगडी आणि रिंगण सोहळा सादर केला. या भक्तिमय सादरीकरणामुळे शाळेत पंढरपूरच्या वारीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एल. लोंढे, प्रास्ताविक एस. ए. मोरे यांनी तर आभार प्रदर्शन आर. एस. पाडुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments