ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिजामाता प्राथमिक शाळेतील बालगोपाळांची दिंडी उत्साहात साजरी. The 'Dindi' procession by the young students of Jijamata Primary School was celebrated with great enthusiasm.

जिजामाता प्राथमिक शाळेतील बालगोपाळांची दिंडी उत्साहात साजरी.

The 'Dindi' procession by the young students of Jijamata Primary School was celebrated with great enthusiasm.
The 'Dindi' procession by the young students of Jijamata Primary School was celebrated with great enthusiasm.

परंडा, दि. २४ (रंगोली न्यूज): The 'Dindi' procession by the young students of Jijamata Primary School was celebrated with great enthusiasm. परंडा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची बाल-दिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून सोडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष अमर साळुंके आणि शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरावटीत आणि "विठ्ठल... विठ्ठल..."च्या जयघोषात बाल-दिंडीची मिरवणूक काढण्यात आली.

दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली संतांची आणि वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा होय. काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केले होते, तर काही वारकरी बनून हातात भगवे झेंडे, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि खांद्यावर विठुरायाची पालखी घेऊन दिंडीत सहभागी झाले. या पारंपरिक वेशभूषेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

दिंडीच्या मार्गावर विद्यार्थ्यांनी टाळांच्या तालावर अभंग गायन करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत लहानग्यांनी पारंपरिक फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला. विशेष म्हणजे या बाल-दिंडी सोहळ्यात पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हा भक्तिमय सोहळा यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाणे, शिला कांबळे, मंगल हिंगनकर, अश्विनी गवारे, सोनाली विभुते, सुजाता देशमुख, धनश्री काळे, दिपाली सुतार आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या संस्कारमय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देतानाच भक्ती, शिस्त आणि सामाजिक मूल्यांचे संस्कारही रुजविण्यात आले. उपस्थित पालकांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments