परंडा येथे इस्लामिक पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; समाजजागृतीचा ज्ञानयज्ञ.
![]() |
| Spontaneous response to the Islamic book exhibition at Paranda; a 'Yajna' of knowledge for social awareness. |
परंडा, दि. २४ (रंगोली न्यूज): Spontaneous response to the Islamic book exhibition at Paranda; a 'Yajna' of knowledge for social awareness. परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे इस्लामिक मराठी पब्लिकेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य इस्लामिक पुस्तक प्रदर्शन व विक्री उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. "वाचाल तर टिकाल" हा संदेश देत वाचन संस्कृतीला चालना देणे, समाजात ज्ञानाचा प्रसार करणे आणि दर्जेदार साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
जमात-ए-इस्लामी हिंदचे जिल्हा संघटक सलीम मनियार, शेख मुसा मोबाईल बुक व्हॅनचे प्रमुख व वाहनचालक अतामोहम्मद यांच्या अथक परिश्रमातून हा समाजजागृतीपर उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी परंडा नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रकाश भगत यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनात प्रेषित मोहम्मद (स.) यांनी मानवतेसाठी दिलेल्या ईश्वरी संदेशाचा परिचय करून देणारी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक प्रबोधन करणारी अनेक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि इस्लाम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे, साने गुरुजी लिखित प्रेषित मोहम्मद, दारूबंदी आणि इस्लाम, स्त्री आणि इस्लाम, आदर्श कुटुंब यांसह विविध समकालीन विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता.
इस्लामी साहित्य, दुर्मिळ ग्रंथ आणि ज्ञानाचा अमूल्य ठेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक वाचनप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देत मोठ्या उत्साहाने पुस्तकांची खरेदी केली. समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि वैचारिक प्रबोधन घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी जुल्फीकार काझी, मनोज कोळगे, राजकुमार देशमुख, नगरसेवक अब्बास मुजावर, मजहर दहेलूस, बाशाभाई शहाबर्फीवाले, राहुल बनसोडे, इरफान शेख, शहाजी वेताळ, जमीयत उलमा-ए-हिंदचे शहराध्यक्ष हाफिज करपुडे, नसीर शहाबर्फीवाले, वाहेद सौदागर, बाळासाहेब माकणीकर, तय्यब अन्सारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाजजागृतीपर ज्ञानयज्ञात सहभागी होत अनेक वाचनप्रेमींनी दर्जेदार साहित्याचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे परंडा शहरात वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच सामाजिक सलोखा, वैचारिक प्रबोधन आणि ज्ञानाचा प्रसार करण्यास मोलाची मदत झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!