ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिवसेना (उ.बा.ठा.) शाखाप्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न; संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार. Shiv Sena (U.B.T.) branch chiefs' meeting concluded enthusiastically; determination to further strengthen the organization.

शिवसेना (उ.बा.ठा.) शाखाप्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न; संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार.

पक्ष संघटन, शाखा बांधणी व आगामी कार्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Shiv Sena (U.B.T.) branch chiefs' meeting concluded enthusiastically; determination to further strengthen the organization.
Shiv Sena (U.B.A.) branch chiefs' meeting concluded enthusiastically; determination to further strengthen the organization.

परंडा दि. १० (रंगोली न्युज) – Shiv Sena (U.B.T.) branch chiefs' meeting concluded enthusiastically; determination to further strengthen the organization. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार परंडा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि. ८ ऑगस्ट रोजी शिवसेना शाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील व परंडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय पांडुरंग नटे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाची तळागाळातील संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, शाखांची कार्यक्षमता वाढविणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीदरम्यान शाखाप्रमुखांनी आपल्या भागातील संघटनात्मक परिस्थिती, नागरिकांशी असलेला संपर्क तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न व अडचणी याबाबतही चर्चा केली. पक्षाची विचारधारा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाखाप्रमुखांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिवसेना शहरप्रमुख रईस भाई मुजावर यांच्यासह शाखाप्रमुख कासिम तुटके, विनोद साळवे, उमेश काका परदेसी, दत्ता मेहेर, गजू तिवारी, अक्षय शिंदे, शुभम आयतवाडे, अर्जुन भानवसे, अरबाज बागवान, साबीर भाई शेख, आलिशान कुरेशी, संतोष गवंडी, तोफिक पठाण, वैभव सुतार, जितेश थोरबोले, हुसेन शेख, सचिन शिंदे, संतोष मेहर, दिनेश बेळगावकर, अरबाज कुरेशी, दत्ता जाधव, दिलीप गोडगे, नेहाल कुरेशी, अभय सूर्यवंशी, अभिलाष सूर्यवंशी, विशाल धनवे व अर्जुन गायकवाड यांच्यासह सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या माध्यमातून परंडा शहरातील शिवसेना संघटनेला अधिक गतिमान करण्यासाठी शाखानिहाय कार्याचा आढावा घेऊन आगामी काळात पक्ष संघटना विस्तारण्याचा निर्धार करण्यात आला. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी शाखाप्रमुखांनी व्यक्त केला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!



Post a Comment

0 Comments