ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आशा गोरख मोरजकर यांना ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार २०२६’ प्रदान. आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून गौरव; शिक्षण क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठा, शिस्त व उल्लेखनीय कार्याची दखल. Asha Gorakh Morajkar was awarded the 'Jijau Maasaheb Adarsh ​​Award 2026'.

आशा गोरख मोरजकर यांना ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार २०२६’ प्रदान.

आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून गौरव; शिक्षण क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठा, शिस्त व उल्लेखनीय कार्याची दखल.

Asha Gorakh Morajkar was awarded the 'Jijau Maasaheb Adarsh ​​Award 2026'.
Asha Gorakh Morajkar was awarded the 'Jijau Maasaheb Adarsh ​​Award 2026'.

परंडा दि. १० (रंगोली न्युज) – Asha Gorakh Morajkar was awarded the 'Jijau Maasaheb Adarsh ​​Award 2026'. परंडा येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संस्थाचालक तथा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव आशा गोरख मोरजकर यांना आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, आष्टी यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजउन्नती, जनजागृती, लोकहित आणि शिक्षण क्षेत्रात आशाताईंनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देणे, शिस्तीचे वातावरण निर्माण करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपणे, या कार्याची पुरस्कार समितीने विशेष दखल घेतली.

आशा मोरजकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक जनजागृती आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असून, त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

पुरस्कार प्रदान कार्यक्रमात आशा मोरजकर यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून भविष्यातील कार्यासाठी त्यांना शिवशुभेच्छा दिल्या.

यावेळी तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे अध्यक्ष ॲड. सीताराम पोकळे, उपाध्यक्ष समीर शेख, सचिव दादा पवळ, कार्याध्यक्ष अंकुश तळेकर तसेच ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आशा मोरजकर यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच सामाजिक व विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments