ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे २०१ जणांचे रक्तदान. 201 people donate blood at Paranda on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis's birthday.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे २०१ जणांचे रक्तदान

201 people donate blood at Paranda on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis's birthday.
201 people donate blood at Paranda on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis's birthday.

परंडा, दि. २२ (रंगोली न्युज): 201 people donate blood at Paranda on the occasion of Chief Minister Devendra Fadnavis's birthday. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने परंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल २०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

या रक्तदान शिबिराचा शुभारंभ भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

रक्तदानासाठी मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांनी मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, सुखदेव टोंपे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. जहीर चौधरी, युवा नेतृत्व सोहम सावंत, जयदेव गोफणे, अनिल पाटील, सारंग घोगरे, बाबासाहेब जाधव, सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, तुकाराम हजारे, साहेबराव पाडुळे, निशिकांत क्षिरसागर, शहाजीआप्पा पाटील, अजित काकडे, प्रमोद लिमकर, विलास खोसरे, डॉ. अमोल गोफणे, जयंत सायकर, मुकुंद चोबे, तुषार नेटके, प्रदीप जाधव, ज्योतीराम गिरवले, सागर पाटील, राहुल जगताप, रवी मांडवे आणि मुकुंद करळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिद्दीक हन्नुरे, व्यंकटेश दीक्षित, अमर ठाकूर, शिवम भातलवंडे, तुषार कोळेकर, शुभम ठाकूर, हिमालय वाघमारे, आकाश मदने तसेच श्री भगवंत ब्लड बँक, बार्शी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरातून सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण झाला असून, गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments