ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल; परंड्यात सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ साळुंके यांचा गौरव. Recognition of notable social work; social activist Jagannath Salunkhe honored in Paranda.

उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल; परंड्यात सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ साळुंके यांचा गौरव

Recognition of notable social work; social activist Jagannath Salunkhe honored in Paranda.
Recognition of notable social work; social activist Jagannath Salunkhe honored in Paranda.

परंडा, दि. २३ (रंगोली न्यूज): Recognition of notable social work; social activist Jagannath Salunkhe honored in Paranda. परंडा येथील कल्याणसागर समूहाच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ साळुंके यांचा परंडा येथे भगवान गडाचे महंत कृष्णा महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते शाल, फेटा, हार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. समाजहितासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

या सन्मान सोहळ्याला माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर, उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सिरसठ, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिवाजीराव कदम (गुरुजी), माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंहजी ठाकूर, कृष्णा काका चैतन्य, चंद्रकांत पवार, किरण गरड, अंगद लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

जगन्नाथ साळुंके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. कुर्डूवाडी रोडवरील समसमपूर मारुती मंदिर व महादेव मंदिर परिसराचे सुशोभीकरण, रंगकाम व स्वच्छतेची कामे त्यांनी पूर्णपणे स्वखर्चाने केली. तसेच परिसर आकर्षक व स्वच्छ राहावा यासाठी सातत्याने परिश्रम घेतले.

याशिवाय कुर्डूवाडी रोडवरील स्मशानभूमीचे सुशोभीकरण, रंगकाम, प्रवेश कमान उभारणी, वृक्षारोपण तसेच इतर विकासकामे त्यांनी स्वतःच्या खर्चातून आणि स्वतःच्या श्रमातून पूर्ण केली. जवळपास पाच वर्षे सातत्याने मेहनत घेत त्यांनी हा परिसर विकसित केला.

सत्काराला उत्तर देताना जगन्नाथ साळुंके म्हणाले की, "वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे. मी स्वतः सायकलवरून पाणी वाहून नेऊन झाडांना नियमित पाणी दिले, खत टाकले आणि त्यांचे संरक्षण केले. समाजहितासाठी सुरू केलेले हे कार्य भविष्यातही अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे."

यावेळी उपस्थित मान्यवरांनी जगन्नाथ साळुंके यांच्या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव करत, त्यांच्या कार्यातून समाजातील युवकांनी प्रेरणा घेऊन सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छता, सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments