ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सांत्वनापर भेट; काकडे परिवाराच्या दुःखात सुजितसिंह ठाकूर सहभागी. Condolences; Sujitsinh Thakur shares the grief of the Kakade family.

सांत्वनापर भेट; काकडे परिवाराच्या दुःखात सुजितसिंह ठाकूर सहभागी.

Condolences; Sujitsinh Thakur shares the grief of the Kakade family.
Condolences; Sujitsinh Thakur shares the grief of the Kakade family.

परंडा दि. १८ (रंगोली न्युज) — Condolences; Sujitsinh Thakur shares the grief of the Kakade family. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील दहिटणा येथील सुपुत्र, उद्योजक तथा लघु उद्योजक महासंघ, पिंपरी-चिंचवड, पुणेचे अध्यक्ष सुनील काकडे यांच्या मातोश्री शारदाबाई शामराव काकडे (वय ९१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

दहिटणा येथे काकडे परिवाराची भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी काकडे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह सुखदेव टोंपे, भाजपा युवा मोर्चा परंडा तालुकाध्यक्ष अजित काकडे, किरण कवठे, दहिटणा-बोडखा गावचे उपसरपंच आबा काकडे, शालेय समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, विशाल काकडे, छत्रपती काकडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत शिंदे, आबा तेंलगे, गणेश काकडे महाराज आदी उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments