ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मोटारसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. The local crime branch busted a gang that robbed motorcycles.

मोटारसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश.

The local crime branch busted a gang that robbed motorcycles.
The local crime branch busted a gang that robbed motorcycles.

परंडा, दि. १८ (रंगोली न्यूज) — The local crime branch busted a gang that robbed motorcycles. मोटारसायकल अडवून मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, परंडा पोलिस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दि. १७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परंडा पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३६२/२०२६ मधील चोरीचा माल व आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल भिमा पवार हा त्याच्या साथीदारांसह येरमाळा परिसरात असल्याचे समोर आले.

पोलिसांनी सापळा रचून अनिल पवार याला येरमाळा मंदिर ते मलकापूर रस्त्यावर मोटारसायकलवरून जात असताना पकडले. चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांसह परंडा हद्दीतील दुधी शिवारात मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका पुरुष व महिलेला अडवून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोनगिरी शिवारात शेतात जात असलेल्या एका महिलेला अडवून मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याचेही आरोपीने सांगितले. चोरी केलेले सोन्याचे दागिने व मोबाईल आरोपीच्या साथीदाराच्या घरी ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथून सोन्याचे दागिने, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमुळे परंडा पोलिस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोलिस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलिस नाईक बाबन जाधवर, पुष्कर मुंगळे, मेहबूब अरब, सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रणनवरे व आरसीपी पथकातील अंमलदार यांनी केली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments