मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ घेण्याचे आवाहन.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६; बँकांना SOPनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश.
![]() |
| (AI Image) Appeal to register the heirs of deceased farmers and avail the benefit of loan waiver. |
परंडा दि. २० (रंगोली न्युज) – Appeal to register the heirs of deceased farmers and avail the benefit of loan waiver. राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ "‘Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Debt Waiver Scheme-2026’" सुरू केली असून, या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच, पात्र यादीतील काही शेतकरी मयत असल्याने त्यांच्या कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे अशा मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महा-आयटीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये काही मयत शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र असली, तरी शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय या कर्जखात्यांना लाभ देता येणार नाही. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर त्यांच्या कायदेशीर वारसांची नोंद करणे आणि त्यांची सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
बँकांनी वारसांची नोंद करून माहिती अपलोड करावी
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करण्यासाठी महा-आयटीमार्फत मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे. यानुसार, योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमधील संबंधित कर्जदार शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झाल्याची माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर बँकेने आपल्या प्रचलित धोरणानुसार संबंधित कर्जखात्यावर वारसांची नोंद करून घ्यावी.
वारसांची नोंद झाल्यानंतर बँकेने योजनेच्या पोर्टलवरील ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेचा वापर करून वारसांची माहिती ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.
वारसांच्या हिश्श्याची नोंद बंधनकारक
मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये प्रत्येक वारसाचा हिस्सा (Share) स्पष्टपणे नमूद करावा लागणार आहे. तसेच मयत शेतकऱ्याऐवजी वारस खातेदारांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.
यामध्ये Sr. No., BR-ID, Heir No., Legal Heir Name, Legal Aadhar No., Date of Birth, Gender, Mobile Number, AgriStack Registry, CIF, Saving Account Number, PAC ID, PAC Membership Number, Loan Account Number आणि Percentage of Share in Loan या माहितीचा समावेश राहणार आहे.
एकाच फाईलमध्ये माहिती अपलोड करावी
महा-आयटीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टलवरील ‘Upload Deceased Accounts’ सुविधेद्वारे माहिती अपलोड करताना संबंधित मयत शेतकऱ्याचा पूर्वीचा BR-ID, पूर्वीचा कर्ज खाते क्रमांक आणि कर्जखात्याशी संबंधित आवश्यक माहिती एकाच फाईलमध्ये अपलोड करावी.
ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत संबंधित शासकीय लेखापरीक्षकामार्फत कर्जखात्याची तपासणी करून घेणे आवश्यक राहणार आहे.
पात्र कर्जखात्यांची यादी पुन्हा प्रसिद्ध होणार
बँकांकडून अपलोड करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीचे महा-आयटीमार्फत योजनेच्या निकषांनुसार संस्करण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या कर्जखात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित वारसांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे.
प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण आवश्यक
योजनेच्या निकषांनुसार मयत शेतकऱ्याच्या प्रत्येक पात्र वारसाने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी अथवा प्रमाणीकरणाच्या वेळी संबंधित वारसाची ॲग्रीस्टॅक नोंदणी व Farmer ID असणे आवश्यक राहणार आहे.
एका मयत कर्जखात्यास एकापेक्षा अधिक वारस असल्यास, योजनेच्या निकषांनुसार कर्ज रकमेमधील प्रत्येक वारसाच्या हिस्स्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात वर्ग करण्यात येणार आहे. मात्र, एखादा वारस योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरल्यास त्या वारसाला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधावा
मयत कर्जदार शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी वारसांची नोंद वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मयत कर्जदारांच्या वारसांची नोंद करण्यासाठी तात्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधावा, बँकेच्या नियमानुसार कर्जखात्यावर वारसांची नोंद करून घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वारसांची नोंद आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास पात्र वारसांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६चा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!