ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

उजनी धरणातून चांदणी व शिराळा उपसा सिंचन योजनांना पाणी सोडण्याची मागणी; माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन. Demand to release water from Ujani Dam to the Chandni and Shirala lift irrigation schemes.

उजनी धरणातून चांदणी व शिराळा उपसा सिंचन योजनांना पाणी सोडण्याची मागणी; माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

Demand to release water from Ujani Dam to the Chandni and Shirala lift irrigation schemes.
Demand to release water from Ujani Dam to the Chandni and Shirala lift irrigation schemes.

परंडा, दि. ४ (रंगोली न्यूज): Demand to release water from Ujani Dam to the Chandni and Shirala lift irrigation schemes. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून विसर्ग सुरू असताना बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे चांदणी (ता. परंडा) मध्यम प्रकल्प तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदार ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, परंडा तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे चांदणी मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला असून सध्या या प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठा निर्माण होऊ शकलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतीसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, परंडा तालुका हा सातत्याने अवर्षणग्रस्त व दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. यंदाही पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.

माजी आमदार ठाकूर यांनी लक्ष वेधले की, चांदणी मध्यम प्रकल्पातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या प्रकल्पात पाणीसाठा नसल्यामुळे बार्शी शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी बार्शी उपसा सिंचन योजनेतून या प्रकल्पात पाणी सोडण्यात आले होते. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे याच संधीचा फायदा घेत चांदणी प्रकल्पात पाणी सोडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेद्वारेही पाणी सोडून परिसरातील पाझर तलाव भरून घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे भविष्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, तसेच शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परंडा तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीर दखल घेत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन चांदणी मध्यम प्रकल्प आणि शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडावे, अशी अपेक्षा नागरिक व शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments