परंडा- प्रतिनिधी दि. ३१) जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुक प्रचारार्थ शिवसेनेचे
माजी मंत्री आमदार प्रा.डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र सोनारी येथे दि. ३१ रोजी श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन, नारळ फोडून डोंजा जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती अविदाबाई भागवत जगताप, डोंजा पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार शशिकांत पाटील व सोनारी पंचायत गणाचे अधिकृत उमेदवार समाधान नलवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार सावंत म्हणाले, “ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्यापुरती मर्यादित नसून, आपल्या गट, गण आणि गावाच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी आहे. शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत विकास पोचवायचा आहे. बुध्दीभेद करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला करा आणी विकासाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार निवडून देण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.” तुंम्ही जि कोणतीही विकासाची कामे करण्याचे सांगाल ति आंम्ही निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार तानाजी सावंत यांनी सोनारी येथील कॉर्नरा सभेत केले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, आर.पी.आय. प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, पै. नवनाथ आप्पा जगताप, रामचंद्र घोगरे, सोनारीचे माजी उपसरपंच अंगद आबा फरतडे, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, ॲड. रणजीत खरसडे, पै. विशाल नाना देवकर, बालाजी नेटके, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, रोसा सरपंच रवींद्र नलवडे, कुंभेजा सरपंच शिवाजी मिसाळ, गोकुळ चव्हाण, लक्ष्मण मोरे व सोनारी, कुंभेजा, भोंजा, खानापूर, डोमगाव, रेसा, मुगाव, कौडगाव, डोंजा आदी गावातील मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!