Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिवसेना (उ.बा.ठा.) चे ता. प्रमुख मेघराज पाटील यांचा राजीनामा. ... आ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) मध्ये मेघराज पाटील यांचा पक्षप्रवेश. .....


 परंडा - प्रतिनिधी दि. ३१) शिवसेना (ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी सदस्यत्वाचा व ताललुका  प्रमुख पदाचा दि. ३१ रोजी राजिनामा देऊन शिवसेना शिंदे गटात माजी आरोग्यमंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला. 

       यावेळी बोलताना आ. तानाजी सावंत यांनी मेघराज पाटील यांना लवकरच पक्षात मोठी जबाबदारी महत्त्वाचे पद देणार असल्याचे सांगीतले. तर याप्रसंगी बोलताना मेघराज पाटील म्हणाले की, मी प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करत असताना माझा राजकीय बळी घेण्यात आला असा गंभीर आरोप करत मेघराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील प्रीतम मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला. व येथेच आ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मेघराज पाटील यांचा आ. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामुळे जि.प.,पं.स. निवडणुकीच्य तोंडावर परंडा तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मेघराज पाटील यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.

        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, पै. नवनाथ जगताप, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, अर.पी.आयचे संजयकुमार बनसोडे, विशाल देवकर, गणेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments