Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जवळा (नि.) जि.प. गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरात सुरवात. ....राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प. चे उमेदवार नानासाहेब पवार यांच्या प्रचाराचा धडाका. ....

परंडा - शहाजी कोकाटे

 परंडा - प्रतिनिध दि. १) परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद जवळा (नि.) गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार नानासाहेब भगवान पवार, पंचायत समिती गणाचे हनुमंत रामदेव कातुरे, सौ. प्रतिक्षाताई मुके यांच्या प्रचारार्थ पदयात्रा व प्रचाराचा शुभारंभ जवळा (नि.) येथील दर्गा हजरत निजामुद्दीन यांच्या ठिकाणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.      
        या प्रचार पदयात्रेचे वैशालीताई समवेत समस्त ग्रामस्थ व कार्यकर्ते, माता, भगिनींनी औक्षण करत प्रचंड उत्साहात स्वागत केले. गेल्या अनेक दशकांपासून समाजकारण, राजकारण, संघटन उभारणी व सामाजिक न्याय या क्षेत्रांत माजी आ. राहुल मोटे व वैशालीताई मोटे यांनी केलेल कार्य कौतुकास्पद आहे. समाजासाठीची निस्वार्थ धडपड, समाजाच्या हक्कांसाठी लढलेली लढाई आणि जनतेच्या प्रश्नांसाठी घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रश्नांकडे केवळ पाहण्यापुरते न थांबता, त्यावर उपाययोजना करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगे आहे.
         तसेच जिल्हा परिषद जवळा नि. गटातील सिरसाव चे ग्रामदैवत दैवत श्री महालक्ष्मी मंदिर येथे सर्व ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मतदारांना उमेदवारांकडून परिचय पत्रक वाटप करून निवडणुकीबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील समस्या त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता येणाऱ्या काळात काम करू, असा विश्वास ग्रामस्थांना दिला. यावेळी देखील माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले. ग्रामस्थांनी आशीर्वाद देत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments