Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धनंजय सावंत यांचा जवळा (नि.) गटात डोअर-टू-डोअर प्रचार. ......ज्योतीताई सावंत यांच्या प्रचाराला महीलांचा मोठा प्रतिसाद. .....




परंडा - प्रिनिधी दि. १) जिल्हापरिषद जवळा (नि.) गटातून माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह ज्योतीताई धनंजय सावंत यांनी त्यांच्या सहकार्या भगिनीसह जवळा (नि.) गटामधील गाव, वाडीवस्तीवर जाऊन डोअर-टू-डोअर प्रचार जोरात सुरू केला असून त्यास मतदारामधुन उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.

        तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या पाच गटापैकी प्रमुख म्हणजे जवळा (नि.) गटाकडे तालुक्याचे लक्ष लागले असून या मध्ये दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २१ हजार २ अशी एकून मतदार संख्या असलेल्या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना (ठाकरे) या पक्षांच्या उमेदवारांसह प्रबळ दावेदार मानले जात असलेले अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांच्या लढतीकने तालुक्याचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रचाराचा शुभारंभ करून धुरळा उडवण्यास सुरवात केली आहे. 

          शिवसेनेतून धनंजय सावंत यांनी बंड करून जवळा (नि.) गटातुन उमेदवारी दाखल केली आणि शिवसेने बरोबर सर्वच पक्षांना धक्का दिला. दि. ७ फेब्रुवारी होणाऱ्या मतदाना साठी धनंजय सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचासाची घोडदौड सुरू केली असून त्यास गाव वाडीवस्ती वरून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. धनंजय सावंत यांच्या प्रचारार्थ ज्योतीताई धनंजय सावंत या देखील प्रचारात उतरल्या असुन त्यांनी जवळा नि. गटातीला प्रतेक गाव वडीवस्तीवरील मतदार भगीनींच्या भेटी घेऊन प्रचाराची जोरात सुरवात केली आहे. त्यास महीलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

[ ] आरणगाव येथील तरूणांचा धनंजय सावंत गटात प्रवेश. ......

जि.प जवळा (नि.) गटाचे उमेदवार धनंजय सावंत यांनी गावभेटी घेऊन प्रचार सुरू केला असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आरणगाव येथील इसुब पठाण, समाधान पिंगळे, धनंजय आदलींगे, प्रमोद तौर, सचिन गायकवाड यांनी धनंजय सावंत यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे.


Post a Comment

0 Comments