परंडा - शहाजी कोकाटे
परंडा - प्रतिनिधी दि. १) जिल्हापरिषद डोंजा गटाचे उमेदवार भाऊसाहेब खरसडे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राहूल मोटे यांनी डोंजा गटातील व गणातील उमेदवार व उपस्थित कार्यकर्त्यांसह दि. १ जानेवारी रोजी सेनारी येथील श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन राहूल मोटे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जि.प. डोंजा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब खरसडे, डोंजा गणाचे उमेदवार पंकज पाटील, सोनारी गणाचे उमेदवार मंदाकिनी मिस्कीन, दादासाहेब पाटील, भागचंद नेटके, राजेंद्र पाटील, राहूल बनसोडे, मलीक सय्यद, यांच्यासह आदी कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कै.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहून मा.आ. राहूल मोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या पक्षाचे अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच नेते, कार्यकर्त्यांसह पवार कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. आणी हे कधी न भरून निघनार नुकसान झाले आहे. अजितदादांच जास्तीच लक्ष आपल्या मतदार संघावर होत. त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, आपल्या मतदारांसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लेखाजोखा, प्रक्षाची धोरणे मतदारांपर्यंत पोचवून आपल्या उमेदवारांना निवडून आणन हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल. अजितदादांनी महाराष्ट्रभर विकासाची कामे केली परंतु आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचा जास्तीचा वाटा अजितदादांनी दिला आहे. पाणी, लाईट इत्यादीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी दादांनी लांवलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे मोटे यांनी आवाहन केले.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!