संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी. ....
शहाजी कोकाटे
परंडा दि. ५) संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम सराफ व्यापारी मनोज चिंतामणी यांच्या "मातोश्री" निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संताच्या नामचितंनाने जिवणात पुण्य संपादन होते. संत शिरोमणी नरहरी महाराज यांनी शैव व वैष्णवांचे एकत्रिकरण केले असे मत ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे यांनी श्रीसंत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.४ रोजी आयोजित किर्तन सेवेच्या माध्यमातून व्यक्त केले.
यावेळी आनंद खर्डेकर, सुरेश घाडगे, मनोज चिंतामणी, सागर लंगोटे, श्रीकांत पोतदार, गोकुळ पंडित, नानासाहेब दिक्षीत, अनिल, पेडगावकर, दशरथ शहाणे, मिलिंद चिंतामणी, भगवान शहाणे, संतोष नष्टे, मनोज शहाणे, भगवान शहाणे, प्रमोद वेदपाठक आदीसह सोनार समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बालाजी महाराज बोराडे पुढे म्हणाले की, देवाला सुद्धा संत सेवा करायला आवडते. जो हरिच्या रंगात नाचतो तो जगात धन्य आहे. आपल्या मुखाने वर्णन करायचे आसेल तर संताचे वर्णन करावे. संत नरहरी महाराज हे शिवभक्त होते त्यांनी नारदीय किर्तनाच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचे महान कार्य केले. देवावर निष्टा व भक्ती कशी असावी याची शिकवन महाराजानी सुवर्णकार तसेच इतर समाजाला दिली. दुपारी ठिक १२.३० वाजता संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर आरती करण्यात आली व उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!