Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

महात्मा गांधी विद्यालयामध्ये स्वयंशासन दिन व शुभेच्छा समारंभ संपन्न. .....

महात्मा गांधी विद्यालयामध्ये स्वयंशासन दिन व शुभेच्छा समारंभ संपन्न. .....

परंडा - दि. ११) महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व शुभेच्छा समारंभ मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमा ची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खरसडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, गजेंद्र (काका) सूर्यवंशी, मु.अ. अनंत सूर्यवंशी, माजी मु.अ. बुरंगे, गोडगे व मांगले  या मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा देऊन १० वी नंतर च्या शिक्षणा बद्दल मार्गदर्शन केले.


   कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक रावसाहेब मोरे, अंकुश मुळूक, तांबोळी लतीफ, वायकुळे सर, शरद पवार उपस्थित होते. तसेच महिला पालक वनिता कोल्हे, सीकलकर रजिया, सीकलकर सोफिया, मोहोळकर ज्योती, लिंबूरकर बाई, बारस्कर सुरेखा, जाधव मंगल, शेख मलेखा, सरवदे रूपाली, सरवदे विमल, सरवदे लक्ष्मी, वायकुळे सुजाता, बोंबलट सुरेखा उपस्थित होते.

स्वयंशासन दिनानिमीत्त पदाधिकारी यांनी पाहीले कामकाज. ...

मुख्याध्यापक सूर्यवंशी ओम उत्रेश्वर, उपमुख्याध्यापक कु. लिमकर भक्ती महादेव, पर्यवेक्षक कु. मोहोळकर स्नेहलधोंडीराम, शिक्षणाधिकारी खरसडे यशराज भाऊसाहेब, उपशिक्षणाधिकारी कु. लुगडे अनुजा दादासाहेब, गटशिक्षणाधिकारी कु. वायकुळे अहिल्या महादेव, क्रीडाधिकारी कसबे रोहित नवनाथ, विस्ताराधिकारी मांडवे हर्षल अविनाश, केंद्र प्रमुख कु. सय्यद आसिया सलीम, लिपिक जाधव ओम महादेव, क्रीडा शिक्षक कु. गवारे सृष्टी उमेश, क्रीडा शिक्षक कु. पाडुळे सिद्धी मच्छिंद्र, क्रीडा शिक्षक कु. सिकलकर शाईस्ता असलम, क्रीडा शिक्षक कु. ठवरे तेजस्विनी तानाजी,  क्रीडा शिक्षक आगरकर प्रथमेश राहुल, क्रीडा शिक्षक जाधव भैरवनाथ जालिंदर,  क्रीडा शिक्षक शेख आहद रियाज,  सेवक कु. शेळके अक्षदा हनुमंत  व सेवक जिनेरी महमद हाजीइसा यांनी स्वयंशासन दिनानिमीत्त कामकाज केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण ठाणांबीर यांनी केले व समारोप बाळासाहेब काशीद यांनी केला.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments