Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथील बावची विद्यालयामध्ये इ. १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. .....

परंडा येथील बावची विद्यालयामध्ये इ. १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. .....

परंडा - दि. १३) बावाची विद्यालय, परंडा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला. 

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार निलेश काकडे, डॉ. महेंद्र सुदाम कदम सर (लेखक-साहित्यिक तथा प्राचार्य विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी), नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, दत्ता (आण्णा) साळुंके, आर.पी.आय. प्रदेश सरचिटणीस, संजयकुमार बनसोडे, प्रा. डॉ. विजय काळे, सौ. अनिता रोडगे, हनुमंत रोडगे, दिनकर (आबा) खैरे, धनाजी खैरे, दत्ता महाराज रणभोर, पै. राहुल भांडवलकर, शंकर पाटील, सतिश भांडवलकर, तुकाराम मारकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण खैरे  यांनी केले. यावेळी डॉ. महेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत जीवनात ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत करण्याचा सल्ला दिला. व विद्यार्थ्यांना आजी कुटूंबाच आगळ या पाठविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार निलेश काकडे, दत्ता (आण्णा) साळुंके आणि संजयकुमार बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

        यावेळी आजच्या स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक कु. आदित्य हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक कु. प्रतिक परमेश्वर सूर्यवंशी, आणि शिक्षणाधिकारी कु. ज्योतीरादित्य रविंद्र शिंदे हे उपस्थित होते. या समारंभात इयत्ता १० वीचे विद्यार्थी श्रेया पाटील, जान्हवी पाटील, यशराज हुके, शिवानी लिमकर आणि अमरनाथ होरे यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेतील आठवणी आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमारे  व संजय वलेकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन शुभम रोडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments