Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वाशी येथे दि. १४ व १५ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन. ..... ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने ग्रंथोत्सवामध्ये सहभागी व्हावे - जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हनुमंत ढाकणे

वाशी येथे दि. १४ व १५ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन. .....

ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने ग्रंथोत्सवामध्ये सहभागी व्हावे - जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हनुमंत ढाकणे

धाराशिव-परंडा दि. १३) - जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशीव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ व १५ फेब्रुवारी असे दोन दिवस धाराशिव ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

      धाराशिव जिल्ह्यातील  वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिराच्या प्रांगणात दि. १४ रोजी सकाळी ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे हस्ते होणार आहे. यावेळी मैत्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि.१४ रोजी सकाळी ग्रंथदिडी काढण्यात येणार असून दुपारी वाचन संस्कृती व आजची स्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी तीन वाजता कथकथन होणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

परिसंवाद, कवी संमेलन व समारोप. ..... रविवार दि. १५ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्य याविषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी तीन वाजता कवी संमेलन आयोजीत करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवा निमित्त आयोजीत परिसंवाद चर्चासत्रात कवी संम्मेलन यासाठी राज्यातील नामांकित विचारवंत साहित्यिक कवी उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंत ढाकणे यांनी केले आहे .



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments