राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा. .....
बावची विद्यालयाचा “आनंद बाजार” उपक्रम ठरला कौतुकास्पद. ......
परंडा दि. १२) विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञानाची जाणीव निर्माण व्हावी तसेच उद्योजकतेची आवड विकसित व्हावी, या उद्देशाने राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी “आनंद बाजार” या मार्केट डे उपक्रमाचे आयोजन बिभिषण रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पो.नि. प्रविण सिरसट, विस्तार अधिकारी सूर्यवंशी, पं.स. वि.अ. प्रफुल्ल गोडगे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा बनसोडे उपस्थित होत्या. यावेळी व्यापारी बबलू जिनेरी, बाबा बहिरे, हाफिजद्दीन करपुडे तसेच पालक सुदाम पाटील, विनोद पाटील, अंगद नलवडे, सचिन मोरे, आबा जगताप, नेमीनाथ मोरे, सुनिल पाटील, पारसराम कोळी, दत्ता नेटके, बालाजी मिस्कीन, आरिफ डोंगरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक दुकाने थाटली होती. यामध्ये खाद्यपदार्थ, खेळणी, शैक्षणिक साहित्य, हस्तकला वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशांचे व्यवस्थापन, ग्राहकांशी संवादकौशल्य तसेच संघभावनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या मार्केट डे स्पर्धेत मोरे अथर्व सचिन यांनी प्रथम, सुरवसे अनुष्का गणेश यांनी द्वितीय तर सूर्यवंशी प्रणव व बुरंगे राघव अनंतराव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आनंद बाजारात तब्ब्ल १ लाख ७६ हजार ९६० रुपयांची उलाढाल झाली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बावची विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांनी केले. सूत्रसंचालन संजय वलेकर तर आभार प्रदर्शन शुभम रोडगे यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!