ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ऊस बिलासाठी शेतकरी हतबल; गळीत हंगाम संपूनही लाखो रुपयांची देयके थकीत. परंडा तालुक्यातील ऊस उत्पादकांची साखर कारखानदारांविरोधात तीव्र नाराजी; साखर आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची गरज. Farmers helpless over sugarcane payments; dues worth lakhs remain unpaid even after the crushing season has ended.

ऊस बिलासाठी शेतकरी हतबल; गळीत हंगाम संपूनही लाखो रुपयांची देयके थकीत.

परंडा तालुक्यातील ऊस उत्पादकांची साखर कारखानदारांविरोधात तीव्र नाराजी; साखर आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची गरज.

Farmers helpless over sugarcane payments; dues worth lakhs remain unpaid even after the crushing season has ended.
Farmers helpless over sugarcane payments; dues worth lakhs remain unpaid even after the crushing season has ended.

परंडा, दि. २१ (रंगोली न्यूज) – Farmers helpless over sugarcane payments; dues worth lakhs remain unpaid even after the crushing season has ended. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी गळीत हंगाम २०२५-२०२६ मधील ऊस बिलाच्या प्रतीक्षेत "Sugarcane farmers await payment for the 2025-2026 crushing season." असून, हंगाम संपून सहा ते सात महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून साखर कारखानदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गळीत हंगामाच्या सुरुवातीच्या काळातील सुमारे महिनाभराचे ऊस बिल काही शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. मात्र त्यानंतर जानेवारी २०२६ पासून हंगामाच्या अखेरपर्यंत परंडा तालुक्यातील ऊसाची तोडणी करून धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांकडे ऊस नेण्यात आला. या काळातील उसाचे बिल मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

काही शेतकऱ्यांना अंशतः रक्कम मिळाली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नसल्याची तक्रार आहे. शेतातून ऊस जाऊन सहा ते सात महिने लोटले असूनही बिलाची रक्कम न मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत.

विशेष म्हणजे, पुढील गळीत हंगाम अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना मागील हंगामाचे पैसेच मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊस बिलाबाबत कारखान्यांकडे विचारणा केली असता "काही दिवसांत पैसे मिळतील" असे आश्वासन दिले जाते. मात्र नेमके पैसे कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण आहे.

परंडा तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीसाठी खत, बियाणे, मजुरी, सिंचन यांचा वाढता खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच घरगुती जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना मोठ्या आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. ऊस बिल वेळेत न मिळाल्याने अनेकांना उसनवारी करावी लागत असून काहींना कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, ऊस उत्पादकांच्या कष्टाच्या मोबदल्याची रक्कम वेळेवर न देणे ही गंभीर बाब असून काही साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

परंडा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन थकीत ऊस बिले लवकरात लवकर अदा करण्यासाठी संबंधित साखर कारखान्यांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळाल्यासच त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होऊन आगामी हंगामासाठी तयारी करणे शक्य होणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments