ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात. Meritorious students felicitated with enthusiasm at Mahatma Gandhi Vidyalaya, Paranda.

महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात.

Meritorious students felicitated with enthusiasm at Mahatma Gandhi Vidyalaya, Paranda.
Meritorious students felicitated with enthusiasm at Mahatma Gandhi Vidyalaya, Paranda.

परंडा दि. २० (रंगोली न्यूज) – Meritorious students felicitated with enthusiasm at Mahatma Gandhi Vidyalaya, Paranda. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी (B.D.O.) रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट आणि पंचायत समिती सभापती सौ. अर्चना आण्णासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी रवींद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांनी यशावर समाधानी न राहता सातत्याने परिश्रम घेऊन उच्च ध्येय गाठावे, असे आवाहन केले. तर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व सांगून भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण ठानांबीर यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून केला. विद्यालयात आयोजित या गौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments