धाराशिव–बीड–लातूर विधान परिषद निवडणूक : परंडा तालुक्यात १०० टक्के मतदान; सर्व २९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.
![]() |
| Dharashiv–Beed–Latur Legislative Council Election: 100% voter turnout in Paranda Taluka; |
परंडा, दि. १८ (रंगोली न्यूज) – Dharashiv–Beed–Latur Legislative Council Election: 100% voter turnout in Paranda Taluka; धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) परंडा तहसील कार्यालय येथे मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात तालुक्यातील सर्व २९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत १०० टक्के मतदानाची नोंद केली.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार देशमुख यांच्यात थेट दुरंगी सामना रंगला. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच मतदारांचा कल महायुतीच्या उमेदवाराकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
परंडा तालुक्यातील एकूण २९ मतदारांमध्ये १३ महिला व १६ पुरुष मतदारांचा समावेश होता. दुपारनंतर बहुतांश मतदारांनी मतदान पूर्ण केल्याने केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
तालुक्यातील मतदारांची पक्षनिहाय रचना पाहता, शिवसेनेचे १३, जनशक्ती विकास आघाडीचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे १, भाजप पुरस्कृत १ आणि शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत १ असे एकूण २९ मतदार मतदानासाठी पात्र होते.
परंडा नगर परिषदेमधील नगराध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांसह २३ सदस्य, परंडा पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा परिषदेचे ५ सदस्य अशा सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान करणारे प्रमुख लोकप्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी काँग्रेस), धनंजय सावंत (भाजप पुरस्कृत), राणी ढोरे (शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत), वैशाली डोके (शिवसेना) आणि अमर मोरे (शिवसेना) यांनी मतदान केले.
तसेच अर्चना जाधव (परंडा पंचायत समिती सभापती) आणि जाकीर सौदागर (परंडा नगर परिषद अध्यक्ष) यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
नगरसेवकांचाही उत्स्फूर्त सहभाग
जनशक्ती विकास आघाडीचे नगरसेवक रत्नमाला बनसोडे, श्रीकृष्ण विधाते, रुक्सानाबेगम पठाण, परवीन बासले, मदनसिंह सद्दीवाल, मदिनाबी पठाण, समरजितसिंह ठाकूर, अनिल शिंदे, वैशाली अलबत्ते, आब्बास मुजावर, रुखियाबी दहेलूस, रमेशसिंह परदेशी आणि स्वीकृत सदस्य इस्माईल कुरेशी यांनी मतदान केले.
शिवसेनेचे नगरसेवक सरफराज कुरेशी, शमीम तांबोळी, सत्तार पठाण, साबेर सौदागर, आमीनाबी मुजावर, मन्नाबी जिनेरी, चंद्रकांत गायकवाड, वनमाला शिंदे तसेच स्वीकृत सदस्य वाजीद दखनी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
प्रशासनाची चोख व्यवस्था
मतदान प्रक्रिया शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. तहसील प्रशासनाने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. सर्व २९ मतदारांनी मतदान केल्याने परंडा तालुक्याने १०० टक्के मतदानाची उल्लेखनीय नोंद करत लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग अधोरेखित केला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!