जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात;
नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.
![]() |
| 'Praveshotsav' (School Enrollment Festival) and a parents' meeting held with great enthusiasm at Zilla Parishad Primary School, Katrabad. |
परंडा दि. १७ (रंगोली न्यूज) – 'Praveshotsav' (School Enrollment Festival) and a parents' meeting held with great enthusiasm at Zilla Parishad Primary School, Katrabad. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या निमित्ताने प्रवेशोत्सव, प्रवेश महोत्सव मेळावा तसेच पालक मेळावा क्रमांक २ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेना परंडा तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे अण्णासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व दप्तरांचे वाटप करून नवीन शैक्षणिक सत्राची आनंददायी सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि पालकांचा मोठा प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी मार्गदर्शन करताना अण्णासाहेब जाधव यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या विकासासाठी तसेच कात्राबाद गावाच्या प्रगतीसाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आणि सामाजिक मूल्ये आत्मसात करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास कात्राबाद गावचे उपसरपंच गणेश कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष इम्रान पटेल, मुख्याध्यापक रवींद्र कापसे, माजी अध्यक्ष विलास गरड, अमोल गरड, हरिदास मोरे, गोकुळ बोराडे, बाबासाहेब भोसले, अनिल गरड, भैरवनाथ बोराडे, गोपीनाथ बोराडे, सुलभा गरड, शिक्षक दीपक मिरकले, विद्यार्थी, पालक तसेच कात्राबाद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र कापसे यांनी करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक मिरकले यांनी मानले.
शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासह नव्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!