ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, परंडा येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत. New students enthusiastically welcomed at Jijamata Primary Vidyamandir, Paranda.

जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, परंडा येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.

New students enthusiastically welcomed at Jijamata Primary Vidyamandir, Paranda.
New students enthusiastically welcomed at Jijamata Primary Vidyamandir, Paranda.

परंडा दि. १६ (रंगोली न्यूज) – New students enthusiastically welcomed at Jijamata Primary Vidyamandir, Paranda. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, परंडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे उपाध्यक्ष अमर साळुंके व शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्सुकता पाहण्यासारखी होती.

यावेळी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असलेल्या पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त, स्वच्छता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी नवीन वर्षात अभ्यासासोबतच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाणे, शिला कांबळे, मंगल हिंगनकर, अश्विनी गवारे, सोनाली विभुते, सुजाता देशमुख, धनश्री काळे, दिपाली सुतार यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments