ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य. Major decision by the state government against the backdrop of El Niño; top priority given to drinking water until August 31.

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य.

Major decision by the state government against the backdrop of El Niño; top priority given to drinking water until August 31.
Major decision by the state government against the backdrop of El Niño; top priority given to drinking water until August 31.

परंडा दि. १३ (रंगोली न्यूज) – Major decision by the state government against the backdrop of El Niño; top priority given to drinking water until August 31. राज्यात यंदा एल-निनो परिस्थितीचा प्रभाव "Impact of El Niño conditions" राहण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. १३ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन पत्रानुसार, राज्यातील सर्व धरणे, जलाशय व इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाने स्पष्ट केले आहे की, पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. यासाठी धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित किंवा सुरू असलेल्या पाणी आवर्तनांना तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या जलसाठ्याचा वापर अन्य कोणत्याही कारणासाठी करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाणीपुरवठा विभाग यांनी समन्वयाने परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

धरणे, कालवे, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी व गस्त घालून अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर साधनसामग्रीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिंचन आवर्तने स्थगित करण्याबाबतची कार्यवाही आणि बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

एल-निनोमुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments