ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंड्याच्या सुपुत्राचा जगात अभिमानास्पद डंका. प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचा जगातील टॉप शास्त्रज्ञांमध्ये समावेश. A son of Paranda is making waves globally, bringing pride to the region.

परंड्याच्या सुपुत्राचा जगात अभिमानास्पद डंका.

प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचा जगातील टॉप शास्त्रज्ञांमध्ये समावेश.

A son of Paranda is making waves globally, bringing pride to the region.
A son of Paranda is making waves globally, bringing pride to the region.

परंडा, दि. १५ (रंगोली न्यूज) – A son of Paranda is making waves globally, bringing pride to the region. परंडा शहराचे सुपुत्र तथा जागतिक दर्जाचे संशोधक आणि शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक प्रा. डॉ. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॉप शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाल्याने परंडा शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

परंडा येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. गजानन राशीनकर हे शिवाजी विद्यापीठात आघाडीचे संशोधक व रसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय शंकरराव राशीनकर हे भू-विकास बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक होते, तर मातोश्री स्वर्गीय उमाबाई वडेकर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड मेहनत व सातत्याच्या जोरावर त्यांनी अनेक वेळा SET आणि NET परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता

महिलांमधील स्तनाच्या कर्करोगावर उपचारासाठी विकसित केलेल्या ‘हायपरथर्मिया’ तंत्रज्ञानावर आधारित चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीच्या संशोधनाला भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील यूके पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे शस्त्रक्रिया किंवा मोठ्या जखमांशिवाय उपचार करणे शक्य होत असून, स्तनाच्या कर्करोगग्रस्त महिलांना किमोथेरपीमुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नॅनो-मेडिसिन क्षेत्रातील त्यांच्या या संशोधनाला वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने नवीन रासायनिक संयुगे तयार करणे, कर्करोगविरोधी संयुगांचा विकास करणे तसेच जैविक दृष्ट्या सक्रिय रेणूंचे संश्लेषण या विषयांवरही त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आहे.

प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचे संशोधन कार्य केवळ परंडा किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाले आहे. त्यांची यशोगाथा युवकांसाठी प्रेरणादायी असून, ज्ञान, संशोधन आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळविता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments