उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे सुरक्षित मातृत्व अभियान संपन्न. ... Rangoli News1
“मातृ व शिशु आरोग्य हीच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली - डॉ. जुबेर शेख.
परंडा दि. १९) उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे दि. १८ रोजी मातृ-मृत्यू दर कमी करणे, उच्च जोखमीच्या गर्भवतींची वेळेवर ओळख करून सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करणे च्या उद्देशाने अतिरिक्त प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान संपन्न झाले.
मातृ-मृत्यू दर कमी करणे, उच्च जोखमीच्या गर्भवतींची वेळेवर ओळख करून सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करणे च्या उद्देशाने
वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर शेख यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभियानांतर्गत मोठ्या संख्येने गर्भवती मातांची सर्वंकष तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “मातृ व शिशु आरोग्य हीच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे” असे प्रतिपादन केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सुरक्षित प्रसूतीसाठी वेळेवर निदान, योग्य रेफरल प्रणाली आणि उच्च जोखमीच्या मातांचे सातत्यपूर्ण निरीक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
या प्रसंगी डॉ. अब्रार पठाण, डॉ. गजानन शेटे, डॉ. आनंद मोरे, डॉ. अभिजीत खरडमल यांच्यासह प्रशासकीय व परिचारिका विभागातून तानाजी गुंजाळ, श्रीमती शितल कुलकर्णी, श्रीमती केसकर, श्रीमती दूधकवडे, श्रीमती थिटे, श्रीमती स्वाती गोणे, अमोल वांबुरकर, आशिष गलाने व कर्मचारीवृंद यांनी समन्वयपूर्वक कार्य करत अभियान यशस्वी केले.
उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. या अभियानामुळे उच्च जोखमीच्या गर्भवतींची वेळेवर ओळख, सुरक्षित प्रसूतीची पूर्वतयारी आणि मातृ-शिशु आरोग्य संवर्धनाला बळ मिळाले असून, भविष्यातील मातामृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!