परंडा - शहाजी कोकाटे
जवळा (नि.) जि.प. गटात प्रचाराची रणधुमाळी जोरात. .....
धनंजय सावंत यांना वाकडी गावातुन त्स्फुर्त प्रतिसाद. ....
परंडा- प्रतिनिधी दि. ३) जिल्हापरिषद निवडणुकीचा झंजावात जोरात सुरू असून जवळा (नि.) गटाचे अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांचे मतदारांच्या भेटीसाठी गावभेट दौरे जोरात सुरू आहेत. दि. ३ रोजी वाकडी येथे व वाडीवस्तीवरील मतदारांच्या भेटी घेतल्या. या गावभेट दौऱ्याला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याच दिसत आहे.
परंडा तालुक्याचे लक्ष वेधुन घेणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीच्या जवळा (नि.) गटाने तालुक्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. अनाळा, शेळगाव, जवळा (नि.), डोंजा, व लोणी या पाच जि.प. गटापैकी जवळा (नि.) गटामध्ये जिल्हापरिषदेचा कारभार हाकाण्यासाठी तब्बल दहा उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. या गटामध्ये एकून २१ हजार २ मते असल्याचा विचार करता व मतांची विभागणी कशी होणार याचा विचार करता सर्वच पक्षासह अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांनी आपली प्रचाराची ताकद पणाला लावली आहे.
धनंजय सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह व सौ. ज्योतीताई सावंत यांनी मागील चार दिवसामध्ये गाव, वाड्यावस्त्या पिंजुन काडून मतदारांच्या भेटी घेत आहेत. दि. ३ रोजी सौ ज्योतीताई धनंजय सावंत यांनी दिनांक बावची येथे गावभेट दौरा करून मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. तर धनंजय सावंत यांनी वाकडी येथील गाव, वाडीवस्तीवर जाऊन वयोवृध्द मतदारांपासून ते तरूणाई यांच्याशी संपर्क साधुन प्रचाराची रंगत वाढवली आहे. त्यास सर्व स्तरातील मतदारांमधुन मोठा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
🗞 📰
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
-:संपर्क:- 👇
रंगोली न्युज 👉
https://rangolinews1.blogspot.com
☝️
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!