Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जवळा गटातील वाकडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची रॉली व कॉर्नर सभा संपन्न. .....

 जवळा गटातील वाकडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची रॉली व कॉर्नर सभा संपन्न. .....

परंडा - प्रतिनिधी दि. २) जिल्हापरिषद जवळा नि. गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नानासाहेब पवार व सिरसाव गणातील उमेदवार प्रतिक्षा मुके यांच्या प्रचारार्थ दि. २ रोजी वाकडी येथे भव्य रॅल काढून कॉर्नर सभा घेण्यात आली.

         परंडा तालुक्यात सर्वच पक्षासह अपक्ष उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहचला असून या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळीत जवळा नि. गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नानासाहेब पवार व सिरसाव गणातील प्रतीक्षा मुके यांच्या प्रचारार्थ वाकडी येथे भव्य रॅली काढून कॉर्नर सभा घेण्यात आली. या जनसंवाद प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आज वाकडीवासीयांनी आपुलकीने आणि जल्लोषात रॅलीचे स्वागत केले. माता-भगिनींनी औक्षण करून विजय आशीर्वाद दिला. यावेळी बोलताना रामभाऊ पवार म्हणाले की गावातील पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक, शिक्षण, आरोग्य व शेतीव्यवसायाला चालना नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज करण्यासाठी व ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा आणि स्थानिक विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प करत असल्याचे सांगण्यात आले. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मतदारांशी हितगुज केले.

Post a Comment

0 Comments