पूरग्रस्त शेळगाव येथील माणिकबाबा विद्यालयाला NAPM व शाश्वत विकास न्यासकडून शैक्षणिक व कार्यालयीन साहित्याची भरीव मदत.
![]() |
| Substantial assistance in the form of educational and office supplies provided to Manikbaba Vidyalaya in flood-affected Shelgaon by NAPM and Shashwat Vikas Nyas. |
परांडा, दि. ३० (रंगोली न्यूज) : Substantial assistance in the form of educational and office supplies provided to Manikbaba Vidyalaya in flood-affected Shelgaon by NAPM and Shashwat Vikas Nyas. सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शेळगाव येथील श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर विद्यालय पुन्हा पूर्ववत उभे राहावे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ मिळावे या उद्देशाने 'जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय' (NAPM) आणि 'शाश्वत विकास न्यास' यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाला शैक्षणिक व कार्यालयीन साहित्याची भरीव मदत सुपूर्द करण्यात आली.
सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ही मदत अधिकृतपणे विद्यालय प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आली. शाळेच्या परीक्षा, वेळापत्रक व उन्हाळी सुट्ट्यांचा विचार करून योग्य नियोजनानंतर प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देत ही मदत देण्यात आली.
या मदतीमध्ये शाळेचे महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी दोन मोठी लोखंडी कपाटे, कार्यालयीन वापरासाठी आवश्यक रजिस्टर, तसेच विद्यार्थ्यांसाठी वह्यांचा बॉक्स आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. याशिवाय NAPM ने पूरग्रस्त भागाचा केलेला अभ्यास आणि त्यावरील अधिकृत अहवालही विद्यालय प्रशासनाला यावेळी सुपूर्द करण्यात आला.
विद्यालयाचे संचालक तथा ज्येष्ठ शिक्षक ह.भ.प. विजयकुमार परदेशी यांनी ही मदत कृतज्ञतापूर्वक स्वीकारत NAPM आणि शाश्वत विकास न्यास यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी अशा प्रकारच्या मदतीमुळे शाळेच्या पुनर्बांधणीस मोठे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी आधार सामाजिक संस्था, परांडाचे झुल्फिकार काझी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व अशा सामाजिक कार्यासाठी संस्थांना शुभेच्छा दिल्या. साहित्याचे वितरण झुल्फिकार काझी, युवराज गटकळ (राष्ट्रीय समन्वय) तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक कुमटकर पांडुरंग सुखदेव, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटाच्या काळात विद्यालयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आवश्यक मदत पुरविल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) आणि शाश्वत विकास न्यास यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
पूरग्रस्त शाळांना वेळेवर मदतीचा हात देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून सामाजिक संस्थांच्या संवेदनशील कार्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दर्शन घडले.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!