ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

हजाराहून अधिक पशुधनधारक शेतकऱ्यांना होणार लाभ १०० टक्के अनुदानावर वैरण मका बियाणे वाटपाचा परंड्यात शुभारंभ Animal Husbandry Department initiative; over a thousand livestock-owning farmers to benefit.

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम; हजाराहून अधिक पशुधनधारक शेतकऱ्यांना होणार लाभ

१०० टक्के अनुदानावर वैरण मका बियाणे वाटपाचा परंड्यात शुभारंभ

Animal Husbandry Department initiative; over a thousand livestock-owning farmers to benefit.
Animal Husbandry Department initiative; over a thousand livestock-owning farmers to benefit.

परंडा, दि. ३० (रंगोली न्युज): Animal Husbandry Department initiative; over a thousand livestock-owning farmers to benefit. शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी वर्षभर मुबलक व दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने १०० टक्के अनुदानावर वैरण उत्पादनासाठी मका बियाणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार, दि. ३० जून रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोलताना भाऊसाहेब खरसडे यांनी पशुधन विकासासाठी हिरव्या चाऱ्याचे महत्त्व अधोरेखित केले. पशुपालक शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मका पिकाची लागवड करून पशुधनासाठी दर्जेदार वैरण उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत परंडा तालुक्यातील सर्व सर्कल, गट व गण स्तरावर एक हजाराहून अधिक पशुधनधारक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मका बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून हे बियाणे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यास मदत होणार असून, पशुधनाच्या पोषणास चालना मिळणार आहे. परिणामी दूध उत्पादनात वाढ होण्यास तसेच पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

याप्रसंगी तालुका पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारी प्रभु तरंगे, परंडा पशुधन विकास अधिकारी पल्ला, सोनारी पशुधन विकास अधिकारी एस. बी. दळवी, अधिकारी शिंदे, गणेश नेटके, पशुसंवर्धन विभागाचे नितीन राऊत यांच्यासह शेतकरी बागायतदार होरे, काकडे, खरसडे, शिंदे, भोसले, बाळासाहेब नेटके, निखिल मोरे, संदीप नेटके, महेश गरड, दादासाहेब पडदुणे, शेळीपालन उद्योजक देविदास सरवदे, नेटके, होरे तसेच तालुक्यातील अनेक पशुपालक शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments