बारामतीच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे मानाप्पावस्ती येथे आगमन
RAWE कार्यक्रमांतर्गत तीन महिने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन; वृक्षवाटपाने उपक्रमाची सुरुवात.
![]() |
| Guidance on modern farming provided to farmers for three months under the RAWE program; initiative launched with tree plantation. |
परंडा दि. १ (रंगोली न्यूज): Guidance on modern farming provided to farmers for three months under the RAWE program; initiative launched with tree plantation. बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे मानाप्पावस्ती (ता. बारामती, जि. पुणे) येथे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत हे कृषिदूत पुढील तीन महिने गावात वास्तव्यास राहून शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य, कीड व रोग नियंत्रण तसेच विविध कृषी विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन "Hands-on guidance on modern agricultural technology, crop management, soil health, pest and disease control, and various other agricultural topics." करणार आहेत.
ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. कृषी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगत तसेच विविध मूलभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या मानाप्पावस्ती गावाची या वर्षीच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषिदूतांच्या गावात आगमनानंतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे गावात कृषी विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षणाबाबतही जनजागृती होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमात पार्थ कुलकर्णी, आदित्य लोहार, प्रसेनजीत कांबळे, तुषार करे, श्रेयश साळुंखे, मयूर पवार आणि सोहेल थोरात हे कृषिदूत विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी गावात विविध कृषी प्रात्यक्षिके, शेतभेटी, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे कार्यक्रम राबविणार आहेत.
या उपक्रमामुळे मानाप्पावस्तीतील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, पीक उत्पादन वाढ, उत्पादन खर्चात बचत, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. कृषी शिक्षण आणि प्रत्यक्ष शेतकरी यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रामीण जीवन व शेती व्यवस्थेचा अनुभव मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!