ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंड्यातील ज्येष्ठ नागरिक सुरेशसिंह (दादा) सद्दीवाल यांचे निधन; शहरावर शोककळा. Sureshsinh (Dada) Saddiwal, a senior citizen of Paranda, passes away; city plunged in grief.

परंड्यातील ज्येष्ठ नागरिक सुरेशसिंह (दादा) सद्दीवाल यांचे निधन; शहरावर शोककळा.

Sureshsinh (Dada) Saddiwal, a senior citizen of Paranda, passes away; city plunged in grief.
Sureshsinh (Dada) Saddiwal, a senior citizen of Paranda,
passes away; city plunged in grief. 
परंडा, दि. १ (रंगोली न्यूज): Sureshsinh (Dada) Saddiwal, a senior citizen of Paranda, passes away; city plunged in grief. परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व सुरेशसिंह चंदनसिंह सद्दीवाल (वय ७०) यांचे बुधवारी, दि. १ जुलै रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परंडा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी, दि. २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता बावची रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुरेशसिंह सद्दीवाल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते परंडा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उमेशसिंह सद्दीवाल व सुभाषसिंह सद्दीवाल यांचे बंधू, तसेच उद्योजक राहुलसिंह सद्दीवाल यांचे वडील होत.

सुरेशसिंह सद्दीवाल हे आपल्या कायम हसतमुख, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या परिचयाचे होते. "दादा" या नावाने ते परंडा शहरात विशेष ओळखले जात होते. सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना झाला. आपल्या संपर्कातील व्यक्तींना मोठ्या भावाप्रमाणे योग्य सल्ला देणे, अडचणीच्या प्रसंगी मदतीला धावून जाणे आणि सर्वांना एकत्र ठेवण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या निधनाने परंडा शहराने एक प्रेमळ, अभ्यासू आणि समाजहिताची जाणीव असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले असून, त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments