धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक संभाजी दैन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
![]() |
| Felicitation of Sambhaji Dain, Branch Manager of Dharashiv District Central Cooperative Bank, on the occasion of his retirement. |
परंडा, दि. १ (रंगोली न्यूज): Felicitation of Sambhaji Dain, Branch Manager of Dharashiv District Central Cooperative Bank, on the occasion of his retirement. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., परंडा शाखेचे शाखा व्यवस्थापक संभाजी माणिकराव दैन यांनी तब्बल ३६ वर्षांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा पूर्ण करून मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात सायंकाळी ५ वाजता निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
संभाजी दैन यांनी १० मार्च १९९० रोजी बँकेच्या सेवेत प्रवेश केला होता. आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रात वेगळी ओळख "A distinct identity in the cooperative banking sector" निर्माण केली. ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक शेतकरी, सभासद आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करत बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले.
या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते विश्वजित पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच पोपटभाऊ गटकुळ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संभाजी दैन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, वाकडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विक्रम पाटील, परंडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण गरड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख रईस मुजावर, खासापुरी विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन दीपक तनपुरे, न्यू इंडिया कंपनीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशमुख, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे माजी मुख्य अधिकारी मोरे, प्रगतशील शेतकरी नानासाहेब भांडवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदाम देशमुख, हनुमंत कुलकर्णी, लेखापरीक्षण विभागाचे माजी कर्मचारी उपेंद्र देशमुख, बाळासाहेब जगताप, देविदास पिंगळे, संजय मादळे, तुकाराम बारसकर, बँकेचे नूतन शाखा व्यवस्थापक संजय माळी, आसू शाखेचे व्यवस्थापक अनिल बागल, दत्ता गटकुळ, पप्पू गरड, गटसचिव जनार्दन गवारे, भाऊसाहेब गायकवाड, सोमनाथ भागडे, अमोल शेळके, महादेव जानकर, शिवराज इनामे, पांडुरंग लांडे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संभाजी दैन यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख सेवाभावाचे कौतुक केले. पुढील आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे वातावरण भावनिक झाले असून, उपस्थितांनी संभाजी दैन यांच्या सेवाभावी कार्याची आठवण सांगत त्यांना निरोप दिला. हा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि जड अंत:करणाने संपन्न झाला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!