परंडा आगारात नव्या ५ एसटी बसांचे आगमन; माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पूजन.
ग्रामीण भागातील प्रवाशांना मिळणार अधिक चांगली वाहतूक सेवा; विद्यार्थी, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा.
![]() |
| Arrival of five new ST buses at Paranda Depot; ceremonial inauguration performed by former MLA Sujitsinh Thakur. |
परंडा, दि. ७ (रंगोली न्यूज) – Arrival of five new ST buses at Paranda Depot; ceremonial inauguration performed by former MLA Sujitsinh Thakur. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परंडा आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसांचे पूजन भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे प्रमुख उपस्थित होते.
परंडा आगारात नव्याने समाविष्ट झालेल्या या बसांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली व सुरक्षित वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाची सोय अधिक सुलभ होणार असून, आगाराच्या सेवाक्षमतेतही वाढ होणार आहे.
या पूजन कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, माजी नगरसेवक शब्बीर (मामू) पठाण, भाजपा तालुका उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, साहेबराव पाडुळे, प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण शहा, परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक संतोष कोष्टी, परंडा आगार प्रमुख रामचंद्र शिंदे यांच्यासह आगारातील चालक, वाहक, तांत्रिक विभागातील कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी नव्याने दाखल झालेल्या बसांमुळे परंडा तालुक्यातील प्रवाशांना अधिक दर्जेदार व नियमित परिवहन सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!