राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जि.प. शाळा हिंगणगाव (बु.) येथे दोन मित्रमंडळांचा स्तुत्य उपक्रम.
शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव, शैक्षणिक साहित्य वाटप, व शाळेला आर्थिक मदत.
![]() |
| A praiseworthy initiative by two friends' groups at Z.P. School, Hingangaon (Bk.), on the occasion of Rajarshi Shahu Maharaj's birth anniversary. |
परांडा, दि. २७ (रंगोली न्यूज): A praiseworthy initiative by two friends' groups at Z.P. School, Hingangaon (Bk.), on the occasion of Rajarshi Shahu Maharaj's birth anniversary. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंगणगाव (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकी जपत दोन मित्रमंडळांच्या संयुक्त पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य (वह्या) वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन अतुल (दादा) ठोंगे मित्र परिवार तसेच नानासाहेब देवकर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश जावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा तसेच राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, वह्या, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अतुल (दादा) ठोंगे मित्र परिवाराच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी ५,१०० रुपये, तर अजित पाटील यांच्या वतीने ५,००० रुपये, अशी एकूण १०,१०० रुपये. तसेच नानासाहेब देवकर मित्रमंडळ यांच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी ११००० रू ची आर्थिक मदत मुख्याध्यापिका शाहेदा हुसेनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲड. ज्ञानेश्वर लोखंडे, नागेश औताडे, अजित नवले, अजित पाटील आणि ओंकार ठोंगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शाहेदा हुसेनी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण कार्यालय, परांडा येथील विषयतज्ज्ञ अंकुश डांगे, तसेच शहाजी राजे ठोंगे, नानासाहेब कदम, प्रकाश भोसले, दत्ता ठोंगे, बाबासाहेब ठोंगे, संतोष (बप्पा) गोरे, लक्ष्मण भिवरकर, लक्ष्मण ठोंगे, दादासाहेब मारकड यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अंधारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उज्वला बावकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब पाटील, सुदर्शन गोरे, धनाजी मारकड, दत्ता ठोंगे, दादासाहेब देवकते तसेच मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण हेच समाज प्रगतीचे प्रभावी साधन असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!