ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ऐतिहासिक ठेव्याचे जतन आवश्यक; 'मराठवाड्यातील मुक्ती संग्रामातील झुंजार सेनानी' ग्रंथाचे अर्चनाताई पाटील यांनी केले कौतुक. Preservation of historical heritage is essential;

ऐतिहासिक ठेव्याचे जतन आवश्यक; 'मराठवाड्यातील मुक्ती संग्रामातील झुंजार सेनानी' ग्रंथाचे अर्चनाताई पाटील यांनी केले कौतुक.

Preservation of historical heritage is essential;
Preservation of historical heritage is essential;

परंडा, दि. २८ (रंगोली न्यूज) : Preservation of historical heritage is essential; धाराशिव येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झालेल्या 'मराठवाड्यातील मुक्ती संग्रामातील झुंजार सेनानी (ऐतिहासिक ठेवा)' या ऐतिहासिक ग्रंथाची प्रत लेखक तु. दा. गंगावणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना भेट म्हणून प्रदान केली.

ग्रंथ हाती घेताच धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आपल्या हाती आल्याची भावना व्यक्त करत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील या भावूक झाल्या. त्यांनी लेखक तु. दा. गंगावणे यांच्या संशोधनपर आणि ऐतिहासिक लेखनाचे मनापासून कौतुक केले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर सेनानींचे कार्य, "The contributions of the brave freedom fighters of the Marathwada Liberation Struggle" त्याग आणि बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे ऐतिहासिक साहित्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तसेच प्रत्येक शाळेत पोहोचले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी हा ग्रंथ आदर्श आणि मार्गदर्शक ठरेल."

लेखक तु. दा. गंगावणे यांनी ग्रंथ निर्मितीमागील उद्देश स्पष्ट करत मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेक दुर्लक्षित क्रांतिकारकांच्या कार्याचा शोध घेऊन त्यांचा इतिहास जतन करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आल्याचे सांगितले. भविष्यातील पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा ऐतिहासिक ठेवा समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. उषाताई रविंद्र गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, रेवन (दादा) ढोरे तसेच जिल्ह्यातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उपक्रमाबद्दल लेखकाचे अभिनंदन केले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments